अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीची कारवाई, अजित पवारांचा भाजपावर गंभीर आरोप
मुंबई – राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी आज ईडीने कारवाई केली. तसेच, वांद्रे येथील त्यांच्या निवासस्थानीही ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याची माहिती समजते. अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली असल्याचं म्हटलं जात आहे.
अनिल परबांवरील कारवाईवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्राच्या यंत्रणांना छापेमारी करण्याचा अधिकार आहे. मागे काहींनी कोणावर कारवाई होणार यावर सुतोवाच केले होते. आणि त्याप्रकारे कारवाई होते. अशाप्रकारे कोणाचा हस्तक्षेप नसावा. मात्र, काहीजण आधीच टीम कुठे जाणार हे सांगतात. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर होऊ नये हीच माफक अपेक्षा आहे, असं वक्तव्य अजित पवारांनी केला आहे.