रहाटणीत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

  • लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि बाबासाहेब त्रिभुवन मित्र परिवार वतीने आयोजन

पिंपरी (प्रतिनिधी) – माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या 8व्या पुण्यतिथीनिमित्त रहाटणी – काळेवाडी भारतीय जनता पक्ष, मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन मित्र परिवार आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना अभिवादन करण्यात आले.

रहाटणी येथील लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे साहेब मार्ग चौक या ठिकाणी शुक्रवारी (दि. 3 जून) सायंकाळी या अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी जेष्ठ प्रबोधनकार शारदा मुंडे, सुभाष दराडे, दीपक नागरगोजे, गोपाळ माळेकर, विनोद तापकीर, भरत ठाकूर, कैलास सानप, नरेश खुळे, संतोष जगताप, गणेश नखाते, शुभम नखाते, निवृत्ती वनवे, महादेव मनोरे, अमोल नागरगोजे, दीपक मनेरे, दीपक लाठे, रमेश शिरसाट, विनोद जाधव, विनोद मुंडे, संजय गायखे, जयप्रकाश दहिफळे, ज्ञानेश्वर नागरगोजे, गोरख सानप, रवी बांगर, मारुती नांदे, अमोल काकडे, धुमाळ सर, अमोल काकडे, पप्पू जायभाई, केशव माने, बाळासाहेब साळुंके, दीपक जाधव, हनुमंत घुगे, गणेश ढाकणे, अभिजित पवार, शिवाजी वाघ, सचिन घुगे, त्रिमुख येलुरे, राजू सानप, लक्ष्मण घुगे, उद्धव हंगे, अण्णा किरवले, प्रकाश देशमुख, दिगंबर सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान यावेळी जेष्ठ प्रबोधनकार शारदा मुंडे, मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन आणि सुभाष दराडे यांनी मनोगतातून लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कीर्तने, प्रास्ताविक दीपक नागरगोजे यांनी तर आभार जयप्रकाश दहिफळे यांनी केले.

Share to