बाळासाहेबांचे विचार जनमानसात पोहोचविण्यासाठी उद्धव ठाकरेंची फौज तयार
- शहर संघटक संतोष सौंदणकर, विभागप्रमुख संदिप भालके यांच्या पुढाकारातुन चिंचवडमध्ये ‘भव्य रोजगार महोत्सवाचे आयोजन..
- लाखो तरुणांना मिळणार रोजगार; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन…
पिंपरी :- माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर, शिवसेना विभाग प्रमुख संदिप भालके आणि जिजाऊ सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा ज्योती भालके यांच्या वतीने ‘भव्य रोजगार महोत्सव २०२३’ या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मेळावा रविवारी (दि. १६) रोजी चिंचवडगावातील चिंचवडे लॉन्समध्ये दुपारी १ ते सायं. ७ वा. या वेळेत होणार आहे. यावेळी कार्यक्रमास माजी मंत्री तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर, उपनेते रवींद्र मिर्लेकर, चिंचवड विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर, जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे, जिल्हाप्रमुख अॅड. गौतम चाबुकस्वार, शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले, शहर संघटिका अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे आणि शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी, युवासेना अधिकारी आदि उपस्थित राहणार आहेत.
संतोष सौंदणकर म्हणाले, पक्षफुटीनंतर प्रथमच पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः पुढाकार घेत पक्षाची विस्कटलेली घडी सावरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पक्षाला नवसंजीवनी मिळावी याकरिता हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या उक्तीला अनुसरून लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर चिंचवड विधानसभेची बैठक नुकतीच सेनाभवनावर पार पडली. बैठकीत शिवसैनिकांची मोठी एकजुट दिसून आली. उध्दव साहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करून पक्षाला पूर्वीप्रमाणे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व शिवसैनिक एकजुटीने कामाला लागले आहेत. त्या अनुषंगाने येत्या रविवारी चिंचवड विधानसभेच्या वतीने (दि. १६) रोजी चिंचवडमध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यातून गद्दारांना पक्षाची ताकद दिसेल.
या रोजगार मेळाव्याबाबत माहिती देताना आयोजक संदिप भालके म्हणाले, मॅन्युफॅक्चरींग, आय टी, बँकींग, फायनान्स, रिटेल, फार्मसी, बीपीओ, केपीओ, हॉस्पिटॅलिटी, फॅसिलिटी, इन्शुरन्स, ऑटोमोबाईल्स, टेलीकॉम अशा राष्ट्रीय आणि बहुरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग या रोजगार मेळाव्यात असणार आहे. मेळाव्यातील सहभागासाठी ५ वी ते १२ वी पास / नापास, सर्व पदवीधर, पदव्युतर डिप्लोमा, आय. टी. आय, तसेच अंतिम वर्ष पदवी परिक्षेस बसणाऱ्या उमेदवारांनाही सहभागी होता येईल. मुलाखतीस येताना उमेदवारांनी बायोडाटा व मुळ कागदपत्रे, पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड, मतदान कार्ड सोबत आणावे. अर्ज स्वीकृती आणि मुलाखत एकाच वेळी होणार असुन पात्र उमेदवारांची नोकरीसाठी जागेवरच निवड केली जाणार आहे. मोठ्या संख्येने युवक आणि बेरोजगार तरुणांनी मेळाव्यास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन संदिप भालके यांनी केले आहे.