वाकडच्या प्रभाग 25 मध्ये कामे करु नयेत म्हणून मातोश्रीतून खोडा – आमदार लक्ष्मण जगताप

  • ‘भाऊ’चा ‘आॅन द स्पाॅट’ फैसला; अधिका-यांना पंधरा दिवसाचा अल्टिमेटम

पिंपरी – आपल्या प्रभागात बोलघेवडे पुढारी आहेत. नुसतंच वा-यागत कुत्र्यासारखं भुंकतात. शहरभर जणू राष्ट्रीय नेते असल्यासारखे वागतात. परंतू वाॅर्डात कसल्याही प्रकारचे लक्ष नसतं, आम्ही महापालिकेतून कामे मंजूर केली की हेच प्रभागात अडवून ठेवतात. या प्रभागात कामे करु नयेत. म्हणून मंत्रालयासह मातोश्रीतून अधिका-यांना फोन येताहेत. त्यामुळे त्या नगरसेवकाला वाटेल तेव्हा कामे करायची का? इथून पुढे असं होता कामा नये. प्रलंबित सर्व कामाचा आढावा येवून येत्या पंधरा दिवसात सर्व कामे मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ब, ड,ग आणि ह या चार प्रभागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा सोयीकरिता चार पाण्याचे टँकर देण्यात आले. वाकड प्रभाग 25 मधील ओमेगा पॅरेडाइज् सोसायटी शोनेस्ट टॉवर येथे हा कार्यक्रम झाला. आहे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास 9 हजार लिटर क्षमतेचा पाण्याचा टँकरचे वितरण आमदार जगताप यांच्या हस्ते व महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रभाग अधिकारी श्रीनिवास दांगट, नगरसेवक बाबा त्रिभुवन, नगरसेविका झामाबाई बारणे, सुनीता तापकीर, सुरेश भोईर, हर्षल ढोरे, गोपाळ मळेकर आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले की,  वाकड परिसरातील प्रभाग 25 मध्ये विविध विकास कामे प्रलंबित आहेत. त्या कामांचा आढावा महापाैर, पक्षनेते यांनी घेतला आहे. प्रभागातील अतिक्रमण, प्रलंबित विकास आराखड्यातील रस्ते, ड्रेनेज लाईन यासह अन्य कामे तातडीने मार्गी लागतील. या प्रभागात भाजपचा एकही नगरसेवक नाही. तरीही सगळ्यात जास्त कामे आम्ही केली आहेत. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रलंबित पाईपलाईनचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे भविष्यात पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. आपला एकही नगरसेवक नसताना सगळ्यात जास्त निधी देखील दिला आहे. त्यामुळे पुढच्या वेळेला या प्रभागातून चारही नगरसेवक भाजपचे निवडून आले पाहिजेत, अशी माफक अपेक्षा आपणाकडे व्यक्त करतो. असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक विनायक गायकवाड, राम वाकडकर, विशाल कलाटे यांनी केले. टँकरमुळे वाकड भागातील नागरिकांना पिण्याचा पाणीपुरवठा करता येणार आहे. पाणी पुरवठा करण्याचा प्रश्न कमी होणार आहे.

Share to