एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असलेल्या आमदारांची संख्या उघड, पक्षाकडून आली माहिती समोर

मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे बंडखोरी केल्यानंतर आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा केला आहे. शिवाय आमदारांसोबतचा फोटोही शेअर केला होता. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा नेमका आकडा समोर आला आहे.

महाविकास आघडी सरकार पडण्याच्या जोरदार चर्चा चालू असताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना शिवसेनेने एक पत्र पाठविले आहे. शिवसेनेच्या आमदारांना शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी हे पत्र पाठवले आहे. शिवसेनेच्या या कृतीला एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल पुढे जात थेट आव्हान दिलं आहे.

या संदर्भातील ठराव एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्षांकडे पाठवला आहे. या ठरावावर शिवसेनेच्या एकूण ३४ आमदारांच्या सह्या आहेत. मात्र शिंदे यांच्यासोबत अपक्ष आमदार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचा आकडा मोठा आहे. मात्र शिवसेनेतून बाहेर जाण्यासाठी शिंदेंना ३७ आमदारांची गरज भासणार आहे.

Share to