सरकार कोसळण्याअधी राजकीय गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, शेतक-यांनाही मिळणार अनुदान

मुंबई : महाराष्ट्रातील सरकार कोसळण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र सरकारने कर्जाचे पैसे नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, राजकीय आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर, काँग्रेस नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, कोविडची स्थिती आणि नियमित विषयांवर चर्चा झाली.
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झालेले आहेत. एवढेच नाही तर आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे महाविकास आघडी सरकार पडणार अशी चर्चा चालू आहे.
दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना विधानसभा बरखास्त करण्याची शिफारस करू शकतात असे संकेत दिले आहेत.

Share to