‘सक्षम’ या नृत्य सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

  • भारतीय विद्या भवन, इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम

पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत मेघना साबडे प्रस्तुत  ‘ सक्षम’  या नृत्य कार्यक्रमाने रसिकांची मने जिंकली

या कार्यक्रमात नृत्यांजली अकॅडमीच्या शिष्यांनी भरतनाट्यम मधे दूर्गास्तूती, महादेव याचे सादरीकरण केले. अभिव्यक्ती कथक नृत्यसंस्थेतील शिष्यांनी सामूहिक  नृत्यात शीव धृपद, थाट, आमद , तोडे परन, आणि चतरंग चे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. सुदीक्षा अनंतरमन यांनी भरतनाट्यम सादर केले.

सूत्रसंचालन अश्विनी भावे यांनी केले. हा कार्यक्रम गुरुवार, ३०  जून  २०२२ रोजी सायंकाळी ६.१५  वाजता  भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  झाला.

हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा  १२७ वा कार्यक्रम  होता.

भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. स्वाती दातार आणि मेघना साबडे यांनी प्रा.नंदकुमार काकिर्डे यांचा सत्कार केला. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या वतीने सहभागी कलाकारांचा ज्ञानेश्वरीची प्रत आणि प्रशस्तीपत्र  देऊन सत्कार करण्यात आला. नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘सक्षम ‘ या कार्यक्रमाचे आयोजन मेघना साबडे यांनी केले होते.

Share to