विविध सामाजिक उपक्रमांनी पंकजा मुंडे यांचा वाढदिवस साजरा
पुणे – भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव, महाराष्ट्रच्या माजी ग्रामविकास मंत्री लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
भारतीय जनता पार्टीचे माजी शहर अध्यक्ष व पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या हस्ते पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात रुग्णांना फळवाटप, आळंदी येथील अंध शाळेत शालेय साहित्य व अन्न, धान्य वाटप, शाहू नगर भागातील मनपा सफाई कामगारांना रेनकोट वाटप आणि पूर्णा नगर येथील उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी दक्षिण भारत आघाडीचे प्रदेश अध्यक्ष राजेश पिल्ले, माजी उप महापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, राजू दुर्गे, माऊली थोरात, योगिता नागरगोजे, कमल मलकानी, भाजपा मंडळ अध्यक्ष विजय शिनकर, प्रभाग स्विकृत सदस्य देविदास पाटील, शहर जिल्हा चिटणीस प्रा. गणेश ढाकणे, दिपक नागरगोजे, सतीश नागरगोजे, गणेश वाळुंजकर, विशाल वाळुंजकर, कैलास सानप, हनुमंत घुगे, मुन्ना बाविसकर, शारदा मुंडे, शोभा भराडे, ललिता पाटील, देवदत्त लांडे, ज्ञानेश्वर नागरगोजे, जयेश चौधरी, शेषराव आघाव उध्दव सानप, सचिन बांगर, विनोद मुंडे, गोरक्ष सानप, हनुमंत घुगे आदींसह भाजपाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.