रहाटणीतील न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती साजरी
पिंपरी – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले इएज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मध्यम स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व प्रमुख पाहुणे माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रणिता जाधव, आरती जाधव, वैष्णवी गवळी, तारा विश्वकर्मा, अर्पिता तिवारी, यशश्री कुटे या विद्यार्थानी आपले मनोगतात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्याविषयी माहिती दिली.
प्रमुख पाहुणे माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव यांनी या महान पुरुषांबद्दल माहिती सांगितली. सूत्र संचालन तन्मय इंगळे या विद्यार्थ्याने यांनी केले. तर रिया परमार या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वृन्द उपस्थित होते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे कार्यक्रमानिमित्त शाळेत निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.