बिहारमध्ये राजकीय भूकंप : मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा मोदींना धक्का, बिहार सरकार कोसळले

मुंबई – बिहार सरकारमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि जनता दल (संयुक्त) यांच्यातील युती संपुष्टात आली आहे. याबाबतची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली. नितीश कुमार यांनी एनडीएमधून बाहेर पडून भाजपला मोठा धक्का दिला असल्याचे दिसत आहे.

मागील काही दिवसांपासून युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तीव्र राजकीय अटकळींनंतर अखेर युती तोडल्याची घोषणा नितीश कुमार यांनी केली आहे. नितीश कुमार यांनी आज आपल्या पक्षातील सर्व खासदार आणि आमदारांची बैठक घेतली. त्यानंतर ही घोषणाा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार आज दुपारी ४ वाजता राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती समजत आहे.

नितीश कुमार यांनी भाजप सोडल्यास काँग्रेस आणि आरजेडीने महाआघाडी २.० साठी तयार असल्याचे संकेत काँग्रेसने अगोदरच दिले दिले आहेत. बिहार विधानसभा निवडणूक 2020 मध्ये 243 जागांपैकी नितीश यांच्या पक्ष जेडीयूने 45 जागा जिंकल्या. तर भाजपला 77 जागा मिळाल्या होत्या. जेडीयूने कमी जागा जिंकूनही भाजपने नितीश यांना मुख्यमंत्री बनवून त्यांच्याकडे राज्याची कमान सोपवली होती.

बिहार विधानसभा निवडणुकीत 2020 मध्ये राष्ट्रीय जनता दलाने 79 जागा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 19 जागा जिंकल्या. तर आम्हाला 4 जागा मिळाल्या. बहुमताचा आकडा 122 आहे. असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्यातील सत्ता कोणाच्या हाती जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share to