ड्रग्ज प्रकरण : आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटींची मागणी, समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ
मुंबई – डर्ग्ज प्रकरणात प्रसिध्द अभिनेता शाहरूख खानचा सुपुत्र आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप करण्यात आले. आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा देखील त्यांच्यावर आरोप झाला. त्यांनी टीव्ही माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई संशयास्पद असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे. यानंतर आता समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उद्या एनसीबीचं दिल्लीतील एक पथक मुंबईला येणार आहे. पथकात NCB चे उपसंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्यासह अन्य दोन इन्स्पेक्टर पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती एनसीबीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील स्वतंत्र साक्षीदार प्रभाकर साहिल यांनी सोमवारी मुंबई पोलीसांच्या क्राईम ब्रांचच्या सहआयुक्तांची भेट घेतली. तसेच, त्यांनी कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं असून त्यामध्ये त्यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोवर खंडणी वसूल करण्याचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील त्यांनी रविवारी प्रसारमाध्यमांना सांगितलं आहे.