राहटणी गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वरूढ पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा
– नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी | महाईन्यूज
प्रभाग क्रमांक २७ रहाटणी गांव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्यासाठी महापालिकेने आदेश दिले. चंद्रकांत नखाते यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. पुतळा उभारण्याचे काम मार्गी लागल्यामुळे राहटणी गावातील शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शिवभक्तांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
नगरसेवक चंद्रकांत बारकु नखाते यांनी ठरावाला दि. २०\१२\२०१८ रोजी मंजुरी घेतली. सतत पाठपुरावा कायम ठेवल्यामुळे आज दिनांक २२\१०\२०२१ रोजी अखेर पुतळा उभारणीचे काम सुरू करण्याचे आदेश पालिकेने ठेकेदाराला दिले. यामुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. रहाटणी गांवठाण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास कार्यसम्राट नगरसेवक चंद्रकांत बारकु नखाते, सुरेश गोडांबे, वसंत नखाते, श्रीराम नखाते, रविंद्र धुमाळ, शुभम चंद्रकांत नखाते यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून शिववंदना देण्यात आली. यावेळी प्रमोद नढे, राजु नढे, शुभम चंद्रकांत नखाते युवा मंच व पदाधिकारी, पै. ॠषिकेश नखाते, पै. अमोल नखाते, पै. अनिल गोडांबे, श्री. सौरभ जाधव, महाराष्ट्र कबड्डी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवगर्जना तसेच आतिशबाजी करित मोठ्या उत्साहात घोषणा देण्यात आल्या.
नगरसेवक नखाते म्हणाले की, राहटणी गावठाण चौकात स्वराज्यरक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा उभारावा ही ग्रामस्थांची इच्छा होती. त्यांच्या वतीने 2018 पासून याठिकाणी भव्य पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर करण्यासाठी सत्तत्याने पाठपुरावा केला. त्याला अजरोजी यश आले असून पुतळा उभारण्याचे काम मार्गी लागले आहे. याठिकाणी महाराजांचा भव्य पुतळा उभारून परिसरात सुशोभीकरण करण्यात येणार आहे, असेही नखाते म्हणाले.