महापालिकेच्या ड आणि इ क्षेत्रीय कार्यालयात घेतलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

पिंपरी – महापालिकेच्या वतीने ड आणि इ या क्षेत्रीय कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला असून, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून केंद्र सरकार व राज्यशासनाच्या निर्देशानुसार आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या वतीने दि. ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुषंगाने आज ड आणि ह क्षेत्रीय कार्यालयात सकाळी १० ते दुपारी २ या वेळात रक्तदान शिबीर पार पडले. यामध्ये ड क्षेत्रीय कार्यालयात ३३ आणि इ क्षेत्रीय कार्यालयात २३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी उप आयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त उमाकांत गायकवाड, राजेश आगळे प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या रक्तकेंद्रा(रक्तपेढी) मार्फत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

दि.१२ ऑगस्ट २०२२ रोजी ‘फ’,’ग’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयात तर दि. १५ ऑगस्ट २०२२ रोजी महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात सकाळी १०:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये घरोघरी तिरंगा, विशेष स्वच्छता मोहीम, प्लास्टिक मुक्त शहर मोहीम, रक्तदान शिबीर, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रंथोत्सव, व्याख्यानमाला, प्रभात फेरी, मानवी साकळीद्वारे राष्ट्रध्वजाची प्रतिकृती तयार करणे अशा उपक्रमांचा समावेश आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Share to