माजी महापौर राहूल जाधव यांच्या वतीने चिखली, जाधववाडी, कुदळवाडी, मोशीत तिरंगा ध्वज वाटप

पिंपरी – भारतीय स्वत्नात्र्याच्या अमृतमोहस्तवा निम्मित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हरघर तिरंगा मोहिमे अंतर्गत मा. महापौर राहुलजाधव यांच्या वतीने चिखली, जाधववाडी, कुदळवाडी, मोशी भागामध्ये नागरिकांना तिरंगा ध्वज वाटप करण्यात येत आहे.

यावेळी बोलताना राहुल जाधव पुढे म्हणाले कि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतील हरघर तिरंगा मोहिमे मुळे येणाऱ्या पिढीमध्ये राष्ट्राभीमान जागृत होण्यासाठी मदत होईल. तसेच, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या राष्ट्र्भक्तांनी बलिदान दिले. त्या सर्व हुतात्म्यांचे बलिदान व त्यांचा इतिहास हा आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

या निमित्ताने सर्व नागरिकांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखून १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रम सर्वांनी राबवावा. तसेच, नागरिकांसाठी तिरंगा ध्वज राहुल जाधव यांच्या कार्यालयमध्ये तसेच आमदार महेश लांडगे यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.

Share to