कोरोना काळात विधवापण आलेल्या महिलांच्या हस्ते मनसेकडून ध्वजारोहण

पिंपरी – करोना काळात एकल्य (विधवा) झालेल्या महिलांच्या हस्ते ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आले. याचे आयोजन मनसे महापालिका कर्मचारी सेनेचे अध्यक्ष रुपेश पटेकर यांच्याकडून करण्यात आले होते.

या वेळी पटेकर म्हणाले की,कोरोना काळात एकल्य (विधवा) झालेल्या महिलांची परिस्थिती अतिशय बिकट असून त्यांना महानगरपालिकेच्या वतीने ठेकेदारी पद्धतीने काम उपलब्ध करून देण्यात यावे.कोणत्याही स्त्रीचे मानवी हक्क नाकारले जावू नये, त्यांच्या मानवी हक्काचे संरक्षण व्हावे या साठी कोविडमुळे विधवा झालेल्या स्त्रियांकरिता रोजगार, मुलांचे संगोपन करण्यासाठी पालिकेच्या मदतीची गरज आहे. अनेक ठिकाणी त्यांना दुजा भाव दिला जातो. त्यांना समाजात मानाचा दर्जा मिळावा यासाठी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले, राजू सावळे, विशाल मानकरी, बाळा दानवले, दत्ता देवतरासे, मयूर चिंचवडे, नितीन चव्हाण, नाथा शिंदे, निलेश नेटके, सुरेश सकट, प्रफुल कसबे, किशोर बारसे, किसन हांडे, अश्विनी बांगर, सीमा बेलापूरकर,अनिता पांचाळ, संगीता देशमुख, श्रद्धा देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Share to