शिवसेना नेमकी कोणाची ? सुनावणी पुन्हा लांबणीवर

मुंबई – राज्यसह अवघ्या देशाचं लक्ष लागून असलेल्या शिवसेना आणि शिंदे गटातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर आज म्हणजेच २२ ऑगस्टरोजी सुनावणी होणार होती. मात्र या संदर्भातील एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिवसेना पक्ष नेमका कोणाचा याचं चित्र या सुनावणीनंतर स्पष्ट होणार आहे. परंतु तूर्तास ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह वेगळा गट निर्माण करत भाजपच्या पाठींब्यावर राज्यात सरकार स्थपन केलं. शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी आम्हीच खरी शिवसेना असल्याचे म्हणत शिवसेनेच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावत याबाबत दाद मागितली. याबाबतची सुनावणी आज पार पडणार होती.

यासंदर्भातील पहिली सुनावणी ४ ऑगस्ट रोजी झाली होती. मात्र त्यानंतर तारीख पे तारीख हा सिलसिला सुरूच आहे. आता ही सुनावणी उद्या म्हणजेच मंगळवार २३ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची याचा फैसला आता उद्या होणार आहे.

Share to