चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप
मुंबई – विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. दुस-यांद्वारे मतदान केल्यामुळे गुप्ततेचा भंग झाल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.
चिंचवड विधानसभेचे मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक हे दोघे भयंकर आजारातून जात आहेत. तरीही त्यांनी पुण्याहून मुंबई येथे प्रवास करून लोकशाही आणि पक्ष निष्ठा जपण्यासाठी राज्यसभा आणि विधानपरिषद या दोन्ही निवडणुकीला हजेरी लावली. त्यांना उभे राहता येत नसल्याने त्यांनी आपले मत कागदावर लिहून दुसऱ्या व्यक्तीमार्फत कागद मतदानाच्या पेटीत टाकला. या गोष्टीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. यामध्ये गुप्ततेचा भंग झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. एखादा व्यक्ती आजारी असेल, तर तो दुसऱ्या व्यक्तीची मदत घेऊन मतदान करू शकतो. परंतु, हे मतदान करताना नियमांचा भंग झाल्याचे काँग्रेसने म्हंटले आहे.