येरवडा कारागृहामधून 418 कच्च्या कैदांची सुटका
पुणे – राज्यातील कारागृहांत कैद्याची संख्या क्षमतेपेक्षा अधिक झाली आहे. कच्च्या कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कारागृहे गर्दीमुक्त व्हावीत, याकरिता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने राज्यभरात “रिलीज-यूटीआरसी (अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी) @ 75′ ही योजना हाती घेतली आहे.
त्याअंतर्गत येरवडा कारागृहामधून महिन्याभरात 418 कच्च्या कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. आगामी काळातही ही योजना येरवडा कारागृहामध्ये सुरू राहाणार असून, त्यासाठी कैद्यांची यादी तयार केली जात आहे. निकषांत बसत असलेल्या कैद्यांची सुटका केली जाणार आहे.