रामनवमी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट
पुणे – रामनवमीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली.

विठूरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक नयनरम्य अशी सफरचंद फळ व फुलांची आरास करण्यात आली आहे.
संपूर्ण मंदिर परिसरात भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे. देवाचे हे रुप पाहून सर्वांच्या डोळ्याचे पारणेच फिटले. भक्तांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे.
