भाजपच्या कुंदाताई यांची पोलीस बांधव आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी
- प्रत्यक्ष भेटून दिल्या दिवाळीच्या अनोख्य शुभेच्छा; कर्मचारीही भारावले
पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२२) :- वर्षभर सार्वजनिक स्वच्छतेची सेवा देऊन पिंपळे सौदागरकरांचे आरोग्य जपणारे आरोग्य विभागातील आरोग्यसेवक, सफाई कर्मचारी तसेच २४ तास सतत कर्तव्य बजावून सामजिक शांतता प्रस्थापित करणाऱ्या पोलीस बांधवांना दिवाळीनिमित भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपूर्वक मिळालेल्या दिवाळी भेटीने पोलीस बांधव आणि आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार भारावले होते.
उन्नती सोशल फाऊंडेशन आणि भारतीय जनता पार्टी, चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई भिसे यांच्या पुढाकाराने पिंपळे सौदागर येथील महिला आरोग्य कर्मचारी, सांगवी पोलीस, वाहतूक विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून दिवाळीच्या शुभेच्छा देत सुखाचे चार क्षण पेरण्यात आले.

सौ. कुंदाताई भिसे म्हणाल्या, पिंपळे सौदागरवासीयांच्या आरोग्यासाठी सफाई कामगार अविरतपणे सेवा देत आहेत. कोरोना काळातही त्यांनी जीवाची बाजी लावून या सेवा पुरविल्या. या कर्मचाऱ्यांच्या योगदानाने नागरिकांचे आरोग्य जपले जात आहे. कर्तव्यदक्ष पोलीस बांधवांच्या योगदानामुळेच आज आपले शहर सुरक्षित आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्या अखंड सेवेबद्दल त्यांचा दिवाळीनिमित सन्माना करण्यात आला. तसेच त्यांना अनोख्या पद्धतीने दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
