पर्यावरण पूरक विसर्जन व मूर्तीदानाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
- माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने कृत्रिम हौदाची सुविधा
पुणे / प्रतिनिधी
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक मधील नागपुर चाळ येथे गणेश विसर्जनासाठी कृत्रिम हौदाची सुविधा देण्यात आली आहे. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने सुरू केलेल्या या उपक्रमाला प्रभागातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा व्हावा, या उद्देशाने दरवर्षी ही सुविधा दिली जाते. यामुळे नागरिकांची विसर्जनाची गैरसोय देखील टळत असून गणेश भक्तांना जवळच विसर्जनाची सुविधा मिळत आहे.
पर्यावरण पूरक गणेशोत्सव, पर्यावरण पूरक गणपती विसर्जन आणि मूर्तीदानाबाबत शासकीय स्तरावरून सातत्याने आवाहन केले जात आहे. प्रशासनाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आपल्या प्रभागात दरवर्षी कृत्रिम हौदाची सुविधा गणेश भक्तांसाठी सुरू केली आहे. गेल्या वर्षांपासून हा उपक्रम आयोजित केला जात आहे. प्रभाग क्रमांक दोन मधील महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, लुंबिनी उद्यान व येरवडा पोस्ट कार्यालयाजवळ ही सुविधा दिली आहे. या उपक्रमाला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी सुमारे दीड हजार गणेश मुर्तींचे संकलन देखील होत आहे. पुणे महापालिकेच्या अधिकार्यांकडे गणेश मुर्ती देऊन विसर्जनाची व्यवस्था केली जात आहे.
चौकट ः अधिकार्यांकडून व्यवस्थेची पाहणी –
महापालिका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन डॉ. धेंडे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला अधिकार्यांकडून देखील सहकार्य मिळत आहे. यंदाच्या वर्षी या उपक्रमाला उपायुक्त किशोरी शिंदे, सहाय्यक आयुक्त करचे, नागटीळक, आरोग्य निरीक्षक स्वप्निल कुताळ यांच्यासह महापालिका कर्मचार्यांनी पाहणी केली. लुंबिनी उद्यान गणपती विसर्जन हौद व येरवडा पोस्ट कार्यालय आदी ठिकाणी पाहणी करत त्रुटी व अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या.
प्रतिक्रिया ः
महापालिका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत गेल्या सात वर्षांपासून प्रभागात कृत्रिम हौदाची सुविधा देत आहे. गणेश भक्तांकडूनही त्याला उत्स्फू र्त प्रतिसाद मिळत आहे. दरवर्षी सुमारे दीड हजार गणेश मुर्तींचे संकलन होत आहे. त्या आम्ही महापालिका प्रशासनाकडे विसर्जनासाठी देत आहे.