महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी | महाईन्यूज

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या वेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, प्रभाग समिती अध्यक्षा शर्मिला बाबर, नगररदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, अखिल वाल्मिकी संस्थेचे कायदा सल्लागार अॅड. सागर चरण आदी मान्यवर उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस महापौर माई ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  या कार्यक्रमास उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, प्रशासन अधिकारी दिलीप करंजखेले, अखिल वाल्मिकी संस्थेचे कायदा सल्लागार अॅड. सागर चरण, आरोग्य निरिक्षक राजकुमार वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना काळात केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल रुग्णालयातील मुकादम मोहन वाघमारे, वॉर्डबॉय तुकाराम लांडगे, सुरेश ताडगे आणि सफाई कामगार राजेश चरण यांचा महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे सभागृह येथे सफाई सेवकांसाठी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.  त्याचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन  झाले. यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुजाता पालांडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, जेष्ठ वेद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सांगळे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, गणेश भोसले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात सिध्देश्वर जोगदंड यांनी त्यांच्या सहकार्यांसमवेत प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर केला.  त्यानंतर प्रसिध्द व्याख्याते अशोक देशमुख यांनी हसत खेळत तणावमुक्ती या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले आणि कामाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी ताणतणाव विरहीत जीवन जगण्याचा संदेश सर्वांना दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Share to