पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अभ्यास दौरा, या नगरसेवकांचा दौ-यात समावेश

पिंपरी | महाईन्यूज

अभ्यास दौ-यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समिती व क्रीडा समितीचे सर्व सदस्य पंजाब व हरियाणा दौ-यावर जाणार आहे. तर, फ प्रभाग समिती आणि शहर सुधारणा समितीचे सदस्य इंदौर दौ-यावर जाणार आहेत. त्याठिकाणच्या विकासकामांची इत्यंभूत माहिती घेऊन त्याधर्तीवर पिंपरी-चिंचवडचा विकास साधला जाणार आहेत.

स्थायी समितीमधील सभापती एड. नितीन लांडगे, सुवर्णा बुर्डे, अंबरनाथ कांबळे, राजू बनसोडे, शशिकांत कदम, शत्रुघ्न काटे, अभिषेक बारणे, निता पाडाळे, सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, सुरेश भोईर, मीनल यादव, पौर्णिमा सोनवणे, प्रविण भालेकर, भिमाबाई फुगे आणि संतोष कांबळे यांचा दौ-यामध्ये समावेश आहे. क्रीडा समितीमधील सभापती उत्तम केंदळे, शारदा सोनवणे, अश्विनी जाधव, शर्मिला बाबर, अपर्णा डोके, डब्बू आसवानी, राजू मिसाळ, रेखा दर्शले हे सर्वजण पंजाब आणि हरियाणा अभ्यास दौ-यावर जाणार आहेत.

शहर सुधारणा समितीमधील सभापती अनुराधा गोरखे, आरती चोंधे, बाळासाहेब ओव्हाळ, सोनाली गव्हाणे, साधना मळेकर, वैशाली घोडेकर, संतोष कोकणे, समीर मासुळकर, सचिन भोसले आणि फ प्रभाग समितीचे सभापती कुंदन गायकवाड, सुमन पवळे, कमल घोलप, पंकज भालेकर, संगिता ताम्हाणे, एकनाथ पवार, संजय नेवाळे, योगीता नागरगोजे, अश्विनी बोबडे, स्वीनल म्हेत्रे, सचिन चिखले हे इंदौर दौ-यावर जाणार आहेत.

क्रिडा विषयक अभ्यास करण्याकरिता पंजाबच्या जालंदर पटियाला, स्पोर्ट अॅथोरीटी ऑफ इंडिया हरियाणा याठिकाणी स्थायी समिती व क्रिडा समिती सदस्य जानेवारी 2022 मध्ये जाणार आहेत. या अभ्यास दौ-याच्या खर्चाला स्थायी समितीने आज मान्यता दिली. तसेच, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत इंदोरचा (मध्य प्रदेश) सन 2021 मध्ये भारत देशात पहिला क्रमांक आला आहे. शहर सुधारणा समिती व फ प्रभाग समिती सदस्यांचा व अधिका-यांचा इंदोर येथे अभ्यास व पाहणी दौरा होणार आहे. त्यासाठीच्या खर्चाच्या ठरावाला आज स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.   

Share to