नितेश राणे यांना कायमचं निलंबीत करा.. शिवसेना आमदार भास्कर जाधवांचा हल्लाबोल
मुंबई – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर शाब्दीक टिपण्णी केल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांचं कायमचं निलंबन करावं, अशी मागणी लावून धरत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात टिका केली. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उत्तर देत भुजबळांचा अपमान केल्याची आठवण करून दिली.
या सभागृहाची प्रथा, परंपरा आणि प्रतिष्ठा राखण्यासाठीचा विषय तिसऱ्यांदा चर्चेला आला आहे. या सभागृहामध्ये तीन दिवसांपूर्वी मी काही अंगविक्षेप केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सभागृहाने मला माफी मागायला, निलंबित करायला सांगितले. त्यानंतर मी माफीदेखील मागितली. पण आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधकांनी आवाज काढले. आमदार सुनील प्रभू यांनी तो विषय मांडल्यानंतर विरोधीपक्ष नेत्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सल्ला दिला. असे वर्तन करू नये असं त्यांच्या पक्षातील नेते देखील म्हणाले होते, तरीही नितेश राणे हे जुमानत नाहीत. बाहेर जाऊन माध्यमांसमोर बोलतच होते,” असं सांगत भास्कर जाधव आक्रमक झाले.
“चंद्रकांत पाटलांची घोषणा होती आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू. तुम्ही त्यांना घडवले की तुम्हाला त्यांनी घडवले हे सांगण्याची गरज आहे. त्याचवेळी त्यांनी थांबवायला पाहिजे होते. त्यांनी थांबवले नाही म्हणून काळ सोकावला आहे. अशा सदस्याला कायमस्वरुपी निलंबित करा अशी माझी मागणी आहे,” असे भास्कर जाधव म्हणाले.