उत्कृष्ट खेळाडुंमुळे महापालिकेच्या नावलौकिकात भर पडली – महापौर माई ढोरे

पिंपरी (प्रतिनिधी) – शहरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडुंमुळे महापालिकेच्या नावलौकिकात भर पडली असल्याचे प्रतिपादन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत पदके मिळविणाऱ्या तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सायकलपटुंचा आणि अन्य गुणवंतांचा सत्कार महापौर माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.

सत्कार प्रसंगी स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त राजेश पाटील ऑनलाईन, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, शहर सुधारणा समिती सभापती अनुराधा गोरखे, महिला व बालकल्याण समिती सभापती सविता खुळे, क्रीडा, कला व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य समीर मासुळकर, नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे तसेच नगरसदस्य, नगरसदस्या  आणि विविध विभागाचे शाखाप्रमुख ऑनलाईन उपस्थित होते.

सत्कारार्थीमध्ये काश्मीर ते कन्याकुमारी हे ३२०० किमीचे अंतर सायकलवरून पार करणाऱ्या सचिन नेमाडे, संदीप उढाणे आणि नवनाथ रोडगे या सायकलपटुंचा सत्कार करण्यात आला. तर २०२१ वर्षातील राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियन स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविलेल्या यश विजय चिनावळे, तन्मय नरेंद्र खांबे, चैतन्य दिलीप आफळे, समृद्धी रामभाऊ शिंदे, आस्मीमनोज राऊत या राष्ट्रीय खेळाडुंचा तसेच सदर स्पर्धेत रौप्यपदक मिळविलेल्या नील खुळे यांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

वयाच्या ८ व्या वर्षी कळसूबाई शिखर सर करणाऱ्या अद्वैत भूषण शिंदे या लहान गिर्यारोहकाचा तर राष्ट्रभाषा प्रारंभिक परीक्षेत भारतातून पहिल्या आलेल्या गौतमी संजय निकम हिचा महापालिका सभेत सत्कार करण्यात आला. महापलिकेचे लिपिक धनंजय पाटील यांनी मराठवाड्यातील एड्सचे समाज शास्त्रीय अध्ययन या विषयावर पी.एच.डी केल्याबद्दल त्यांना सन्मानीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Share to