शहरातील क्रीडा मैदाने, जलतरण तलाव, उद्याने आजपासून पुन्हा सुरू; आयुक्तांचे आदेश

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील आणि पुणे शहरातील जलतरण तलाव, खुली मैदाने, उद्याने आजपासून (दि.२५) पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. याबाबतचे संबंधित आदेश पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि पुणे महापालिका आयुक्त राजेश देशमुख यांनी पारीत केले.

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढला. १ जानेवारी २०२२ पासून शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंढ वाढ होत गेली. दरम्यानच्या काळात रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता या दोन्ही शहराच्या महापालिका प्रशासनाने काही निर्बंध लादले, यामध्ये प्रामुख्याने जलतरण तलाव, खुली मैदाने, उद्याने पुन्हा बंद करण्यात आली होती.

दरम्यान खेळाडूंसाठी जलतरण तलाव सुरु करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले होते. त्यानुसार तलाव, मैदाने पुन्हा खुली करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

आयुक्तांनी आदेशात नेमकं काय म्हटले आहे ?

  • महापालिका क्षेत्रातील जलतरण तलाव फक्त राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये सहभागी होणा-या खेळाडू व प्रशिक्षक यांच्या सरावासाठीच सुरु राहणार आहेत.
  •  इतर कोणाला जलतरण तलावाचा वापर करता येणार नाही.
  •  महापालिका क्षेत्रातील सर्व उद्याने सुद्धा सगळ्यांसाठी सुरू करण्यात आली आहेत.
  •  सकाळी ६ ते ९ या वेळेतच उद्याने सुरु राहणार आहेत.
  •  महापालिका क्षेत्रातील सर्व खुली मैदानेही सुरु राहणार आहेत.
  •  आदेशाप्रमाणे मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोनही डोस आवश्यक आहे.
Share to