राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी राष्ट्र गौरव पुरस्काराचे वितरण

  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विश्व मैत्री संघाचे पुरस्कार जाहिर

पिंपरी (प्रतिनिधी) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विश्व मैत्री संघाच्या वतीने राष्ट्र गौरव पुरस्कार २०२१ – २२ चे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील तज्ञ व मान्यवरांना रविवारी (दि. २७ मार्च) चिंचवड गावातील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे दुपारी २ वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘राष्ट्र गौरव पुरस्कार २०२१ – २२’ देऊन गौरविण्यात येणार आहे अशी माहिती विश्व मैत्री संघाचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

या पुरस्कार्थींमध्ये केंद्रिय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, १००८ महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती, भटक्या व विमुक्त जाती जमाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष भिकू ईधाते, ज्येष्ठ संशोधक संगणक तज्ञ डॉ. विजय भटकर, माजी लेप्टनंट जनरल एल. निशिकांत सिंह, ज्येष्ठ पार्श्व गायिका डॉ. अनुराधा पौडवाल, स्वामी समर्थ केंद्राचे मोरे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, सुदर्शन न्यूज चॅनलचे संचालक रामदास चव्हाणके, उद्योजक ओमप्रकाश रांका, बेटी बचाओ जन आंदोलनाचे राष्ट्रीय मागदर्शक डॉ. प्रमोद लोहार, युवा समाज सेवक डॉ. मनिष गवई, युवा उद्योजक अजित ओझा आणि वाल्मिक समाज संस्थेचे अध्यक्ष राजेश बडगुजर यांचा समावेश आहे अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा प्रियांका गुप्ता यांनी दिली आहे.

या कार्यक्रमास माजी केंद्रिय मंत्री आण्णासाहेब पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, आण्णा बनसोडे, माजी खासदार अमर साबळे, पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील, माजी राज्यमंत्री अमरजित मिश्रा, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर तसेच अर्जुन गुप्ता, अमित गोरखे, सदाशिव खाडे, ओमकार जोशी, प्रेमचंद मित्तल, संदिप जाधव, साध्वी वैष्णवी सरस्वती, पांडूरंग महाराज शितोळे, संतोष शास्त्री महाराज, सुनिल कुमार सिंग, कुसूम तिवारी, सुरेश म्हेत्रे, जितेंद्र गुप्ता, राजेंद्र साह, महेंद्र साव, एल. आर. यादव, रामदास पाटील, अशोक गुप्ता, राजेंद्र कुमार मेवाडा, वकिल गुप्ता, बाळासाहेब हगवणे पाटील, महादेव भोईर, सोमनाथ पाडोळे, रविकांत धुमाळ, वसंत शिर्के, बिंदू तिवारी, शिरीष कारेकर, ॲड. निलेश आमले, बाळासाहेब चौधरी, मिनाताई मोहिते, डॉ. जितेंद्र राठोड आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत अशीही माहिती विश्व मैत्री संघाचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

Share to