मार्चअखेर 622 कोटींचा मालमत्ता कर वसूल
पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाद्वारे चालू वर्षात 31 मार्च अखेर 622 कोटींचा मालमत्ता कर वसूल झाला आहे. मार्चअखेर कर भरण्यासाठी मिळकतधारकांना सवलत देण्यात आली होती.
नागरिकांना सवलतीची माहिती कळावी, यासाठी फ्लेक्स, बॅनर, ऑटो रिक्षाद्वारे जाहिरात करण्यात आली होती. वर्तमानपत्र, रेडीओ, मोबाईल एसएमएसद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्यात आली होती.