पुण्यात उपोषनकर्त्या गावक-यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

पुणे – महापालिकेत सामविष्ट होऊन देखील विकासापासून कोसो दूर ठेवल्याचा सूर काढत आमरण उपोषण करणा-या गावकऱ्यांवर पोलिसांनी अक्षरषः लाठीचार्ज केला. मागील दोन दिवसांपासून कात्रज येथे गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत उपोषण सुरु केले होते. पोलिसांनी मंगळवारी दुपारी लाठीचार्ज करत गावकऱ्यांना हुसकावून लावले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार कात्रज चौकात नमेश बाबर यांच्याकडून आंदोलन सुरु होते. पुणे महापालिकेत कात्रज परिसराचा समावेश होऊन 25 वर्षे झाली. मात्र मुलभूत सुविधा आणि विकास होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. यामध्ये कात्रज, गुजर – निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी परिसरातील नागरिकही उपस्थित होते. चौकातील वाहतूक कोंडी, पाणीप्रश्‍न, महापालिकेचा दावाखाना, मेट्रो अशा अनेक मागण्या लावून धरण्यात आल्या होत्या.

Share to