जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, राष्ट्रवादीनंतर काँग्रेसची ही टिका

मुंबई – भाजपने आपल्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्ररचनेतुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वगळले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बढती देत निवडणूक समितीत स्थान देण्यात आले आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाल्याचे पाहायला मिळते. राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसने देखील यावर भाष्य केलं आहे.

नितीन गडकरी हे कार्यक्षम मंत्री आहेत त्यासोबतच सर्व पक्षीय राजकीय व्यक्तींशी त्यांचे चांगले संबंध आहेत. मात्र भाजपकडून त्याच नाव वगळलं गेल्यानंतर काँग्रेसने थेट ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हंटल आहे,”जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय”. या ट्विटमध्ये काँग्रेसकडून गडकरींनी केलेल्या राजकीय टिपण्णीचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे.

नितीन गडकरींना वगळल्याने वृत्त समोर येताच राजकीय वर्तुळामध्ये अनेक प्रकारच्या चर्च्यांना उधाण आले होते. अनुभवी आणि मुरब्बर व्यक्तिमत्वाला भाजपने नेमकं वगळायचं कारण काय याबाबत अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने देखील प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्विट करत नितीन गडकरी यांचे नाव वगळल्यानंतर भाष्य केलं होत.

Share to