प्रतिक्षा संपली, इयत्ता दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

मुंबई – राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

उद्या म्हणजेच शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल.
दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. राज्यातून एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. मुख्य केंद्र आणि उपकेंद्र मिळून २१ हजार ३८४ ठिकाणी परीक्षा पार पडली.

कुठे बघाल निकाल ?
दहावीचा निकाल बघण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून काही वेबसाईट देण्यात आल्या आहेत.
या वेबसाईटवर बघता येणार निकाल…
http://www.mahresult.nic.in/
http://sscresult.mkcl.org/
https://ssc.mahresults.org.in/

Share to