आता कितीहीवेळा द्या ‘एमपीएससी’ची परीक्षा, वयोमर्यादेची अट केली रद्द
मुंबई – एमपीएससीची परीक्षा देण्यासाठी आता कमाल संधीची अट रद्द करण्यात आली असून आधी केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षार्थींना कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे. याबाबतची घोषणा आज (दि १६) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत ट्विटही केले आहे.
आता विविध प्रवर्गातील उमेदवारांना त्यांना ठरवून देण्यात आलेल्या वयोमर्यादेत कितीही वेळा एमपीएससीच्या वेगवगेळ्या परीक्षा देता येणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेत सुधारणा घडवून आणण्याच्या दृष्टीने काही बदल करण्यात येत आहेत. यूपीएससी परीक्षांप्रमाणे एमपीएससीकडूनही परीक्षा देण्यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली होती.
१)खुल्या प्रवर्गासाठी सहा संधी
२)इतर मागासवर्गीयांसाठी नऊ संधी
३)अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी कमाल संधी मर्यादा नव्हती.
मात्र आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने हा निर्णय मागे घेतला असून पूर्वीप्रमाणेच परीक्षार्थीं कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकतात.