देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार ?
मुंबई – एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसण्याची संधी जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे बाहेर राहणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केला होती. मात्र, आता पुन्हा एक महिती नव्याने समोर आली आहे. फडणवीस हे उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीस यांनी सरकारबाहेर न राहता सरकारमध्ये रहावे, असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर लगेचच फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असल्याचे बोलले जात होते. भाजप आमदारांचे संख्याबळ अधीक असल्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे गणित मांडले जात होते. मात्र, फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत आपण सरकारबाहेर थांबणार असल्याचे जाहीर केले होते.