कांस्यपदक विजेती पूजा सिहागच्या पतीचा संशयास्पद मृत्यू, पोस्टमार्टम रिपोर्टमधून उजेडात आली धक्कादायक माहिती
पुणे – कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्यपदक विजेती पूजा सिहाग नांदलच्या पतीचा संशयास्पद मृत्यू झाला असून पोलीस तपासात समाधानकारक बाबी सोर आल्या नसल्याचं पूजानं माध्यमांना सांगितलं आहे. पतीच्या मृत्यूनंतर पोस्टमोर्टमचा रिपोर्ट ४ दिवसांनी मिळाला. ड्रग्समुळे पतीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आले. परंतु, पती ड्रग्स घेत नव्हता असं पूजा सिहागनं ठामपणे म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
पूजा सिहाग म्हणाली की, मी अजयला गेल्या ८ वर्षापासून ओळखते. अजय नांदलचं नाव ड्रग्सशी जोडण्यात येऊ नये. जेव्हा एक खेळाडू पदक आणतो तेव्हा त्याचे भरभरून कौतुक केले जाते. परंतु त्याचा मृत्यू झाल्यानंतर अशाप्रकारे बदनाम करणं चुकीचं आहे. जर २ लोकांनीही पुढे येऊन सांगितले माझे पती ड्रग्स घेत होते. तर मी ही केस मागे घेईन असंही पूजानं सांगितले आहे.
२७ ऑगस्टला दुपारी एका व्हॉट्सअपला पतीचा मेसेज आला होता. संध्याकाळी बास्केटबॉल मॅच आहे असं म्हटलं. त्यामुळे त्यादिवशी पार्टीसाठी गेल्याचं चुकीचं आहे. अजयचे सहकारी रवी आणि सोनू यांचीही चौकशी करायला हवी अशी मागणी घरच्यांनी केली. पूजा आणि अजयचं लग्न ९ महिन्यापूर्वी झाले होते. हे दोघं एकमेकांना ८ वर्षापासून ओळखत होते. दुपारी ३ वाजता माझं पतीसोबत बोलणं झाले होते. त्यांना घरी यायचं होतं परंतु घरी आले नाही. मीदेखील ट्रेनिंगमध्ये होती. त्यानंतर पतीची तब्येत बिघडल्याचं समोर आले. दिल्लीत परतल्यानंतर त्यांच्यासोबत काय झाले? कुणाला माहिती नाही. माझ्या पतीचा ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाल्याचं सांगून त्यांना बदनाम करण्यात येत आहे असा आरोप पूजा सिहागनं केला.
पोलिसांच्या प्रश्नांना तो उत्तरे देत नाही
पूजा म्हणाली, ‘मला फक्त सत्य बाहेर यायचे आहे. त्याच्यासोबत असलेले रवी आणि सोनू या दोघांनाही सत्य माहिती आहे. पोलिसांनी त्यांची कडक चौकशी केली तर सत्य बाहेर येईल. केवळ सत्य बाहेर यावं असेच मला वाटते. रवी हा पतीचा जुना मित्र होता. तो आखाड्यातही सराव करायचा. तोही पूर्णपणे ठीक आहे, पोलिसांनी त्याची चौकशी करावी. तो दिल्लीतील डिफेन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे. पोलिसांच्या प्रश्नांना तो उत्तरे देत नाही असं तिने सांगितले.
सीसीटीव्हीत घटना कैद
अजयच्या वडिलांनीही रवीविरुद्ध निर्दोष हत्येचा गुन्हा दाखल केला होता. अजय नांदलच्या मृत्यूप्रकरणी पोलीस आणि कुटुंबीयांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळाले आहे. यामध्ये रवी हॉस्पिटलच्या बाहेर अजयला गाडीतून उतरवताना दिसत आहे. त्यावेळी रवीची प्रकृती चांगली आहे, परंतु त्याला नंतर दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशा परिस्थितीत अजय नांदलची पत्नी पूजाने रवीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पूजाने सांगितले की, पतीबद्दल समजल्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये गेली होती. त्यानंतर सोनूला तेथे दाखल करण्यात आले तर रवी अजयचे हात-पाय चोळत होता. रवीला या घटनेबद्दल विचारले असता, आपण तिथे उपस्थित नसल्याचा त्याने स्पष्ट शब्दांत इन्कार केला. त्यानंतर रवीला दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले.