मी शिवसेना बोलते… बंडखोरीवर भाष्य करणा-या मंडळाच्या देखाव्यावर शिंदे सरकारची कारवाई
मुंबई – सध्या गणेशोत्साची सगळीकडे रेलचेल पाहायला मिळत आहे. गणरायाच्या आगमनानंतर आता सर्वांचे लक्ष देखाव्याकडे लागले आहे. राज्यात सुरु असलेल्या राजकारणाचे प्रतिबिंब देखील अनेकांनी देखाव्यातून साकारल्याचे समोर आले आहे. कल्याण पश्चिम येथील विजय तरुण गणेशोत्सव मंडळाने ‘मी शिवसेना बोलते’ नावाचा देखावा उभा केला होता. त्यावर पोलिसांनी आक्षेप घेत कारवाई केली आहे.
शिवसेनेत झालेली बंडखोरी आणि राज्यात झालेले सत्तांतर यावर भाष्य करण्याचा प्रयत्न विजय तरुण मंडळाने केला होता परंतु कायदा सुव्यवस्था बिघडू नहे यासाठी देखाव्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. यानंतर कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शिवसेना आणि शिंदे गटामध्ये घडलेले राजकारण महाराष्ट्रासह देशाने पाहिले याबाबतचे चलचित्र देखाव्यात मांडण्यात आले होते मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. महाआरतीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी यावेळी झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त केला.