श्री गजानन सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अनुराधा गोरखे यांची निवड

पिंपरी – बँकेचे अध्यक्ष स्व. मधुकर बाबर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाल्याने श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक, चिंचवड या बँकेचे अध्यक्षपद रिक्त झाले होते. बँकेच्या ज्येष्ट संचालिका माजी नगरसेवक अनुराधा गोरखे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

गोरखे या गेली बावीस वर्षे राजकीय व सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच, श्री गजानन लोकसेवा सहकारी बँकेच्या स्थापनेपासून त्या बँकेच्या संचालिका आहेत. नियमाप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या सहकार खात्यातर्फे अध्यासी अधिकारी नवनाथ अनपट (भोसले), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी ( १ ऑगस्ट) रोजी बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

नवनिर्वाचित अध्यक्षा अनुराधा गोरखे यांनी सर्व संचालक मंडळाचे आभार मानून पुढील काळात बँकेच्या प्रगतिसाठी कटिबद्ध राहू असे मनोगत व्यक्त केले.

सदर निवडणूक प्रक्रियेवेळि उपाध्यक्ष रमेश वाणी, संचालक दिलीप देशमुख, शंकर वाडकर, आनंदराव निकम, अशोक काळभोर, अतुल इनामदार, धर्मेंद्र थारेवाल, वंदना भांगडिया, वत्सला जाधव, एड. अमित चौकडे, एड. भयकुमार आपटे हजर होते.

Share to