आश्वासन देऊन नाही तर विश्वासाने जिंकणार : डॉ. मदन पाटील
- कुरळप मध्ये युवक क्रांती पॅनेलची सभा उत्साहात
महाईन्यूज ! सांगली
कुरळप गावाचा विकास हा एकच ध्यास ठेऊन आम्ही युवक क्रांती पॅनेलच्या माध्यमातून काम करत आहोत. जनतेला विरोधकांसारखे केवळ आश्वासन देऊन नाही तर विश्वास देऊन आम्ही काम करून जिंकणार आहोत. अनेक वर्ष काम करूनही विरोधकांना यंदा चांगले उमेदवार मिळाले नाहीत. एकाही जुन्या चांगल्या सहकाऱ्याला उमेदवारी देता आली नाही. विरोधकांना जनता त्यांची जागा दाखवेल, अशी घणाघाती टीका कुरळप गावचे सरपंच पदाचे उमेदवार डॉ. मदन शेटे यांनी केली.
कुरळप येथील वारणा बझार समोर युवक क्रांती पॅनेलची सभा पार पडली. या वेळी डॉ. शेटे बोलत होते. पॅनेलचे नेते पैलवान अशोक पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सभा पार पडली. या वेळी वारणा दूध संघाचे विद्यमान संचालक विटे आबा, माजी संचालक ज्ञानदेव पाटील, शिवाजी नागरी पतसंस्थेचे चेअरमन सुभाष पाटील. माजी तंटामुक्त अध्यक्ष मारुती जाधव, शिवाजी पाटील, अरुण देवकर, सुनील पाटील, ऍड. राजू पाटील आदींसह पॅनेलचे सर्व उमेदवार या वेळी उपस्थित होते.
डॉ. मदन शेटे म्हणाले की, गावात ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी असणारे नेते कोरोना काळात घरातून बाहेर पडायला तयार नव्हते. त्या काळात आम्ही फळ वाटप, किट वाटप केले. सणांच्या काळात फळ वाटप केले. १० वी व १२ वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. महापुर आलेला असताना ऐतवडे खुर्द येथे जाऊन जेवणाचे वाटप केले. शिक्षणात चांगली कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार केला. या कामाच्या जोरावरच फक्त पाच वर्षच गावात पॅनेलला काम करण्याची संधी मागत आहे. हे काम पाहूनच युवक क्रांती पॅनेलकडे अनेक चांगले उमेदवार येत आहेत. या उलट विरोधकांनी गावात गैरव्यवहार केले. त्यामुळे त्यांच्याकडे चांगले उमेदवार देखील दिसत नाहीत. उमेदवार न भेटल्याने स्वतःच्या शाळेतील शिपायांची पत्नी, दूध संघातील कामगार आदींना उमेदवारी देण्याची वेळ आली. २८ वर्ष चेअरमन असणाऱ्यांना जुन्या एखाद्या संचालकाला उमेदवारी देता आली नाही, हे दुर्देवी असल्याचे डॉ. मदन शेटे म्हणाले.
बातम्यांसाठी संपर्क करा
- प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज सांगली
- मो. नं – ७३५०२६६९६७