जेल रोड ते फाईव्ह नाईन चौक होणार प्रशस्त ; आरपीआयच्या पाठपुराव्याला यश – डॉ. सिद्धार्थ धेंडे
- पाच वर्षांपूर्वीच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले होते उदघाटन
महाईन्यूज ! पुणे
जेल रोड पोलिस चौकी ते फाईव्ह नाईन चौक प्रशस्त होणार आहे. यासह फाईव्ह नाईन चौक ते विश्रांतवाडी कडे जाणाऱ्या या रस्त्याच्या कामाला सध्या नुकतेच २१ कोटी रुपये महापालिका खर्च करणार आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी आरपीआयच्या वतीने लक्ष घालून या कामांना मंजुरी घेतली होती. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन देखील करण्यात आले होते. सुरुवातीच्या टप्प्यात जेल रोड पोलिस चौकी ते संजय पार्क उद्यानांपर्यंत काम करण्यात आले. ही जागा एअरफोर्स कडून ताब्यात घेण्यापासून सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत. त्या पाठपुराव्याला यश आले असून आता नव्याने हा रस्ता महापालिकेच्या वतीने तयार करण्यात येणार आहे. हे श्रेय पूर्णपणे आरपीआयचे असल्याचे प्रतिपादन पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
डॉ. धेंडे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, विमानतळाच्या प्रवेशद्वारापासून ते येरवडा कडे जाणारा रस्ता, त्याचबरोबर फाईव्ह नाईन चौक ते विश्रांतवाडी कडे जाणारा रस्ता महापालिकेच्या वतीने नव्याने बनविण्यात येणार आहे. दोन्ही रस्त्यासाठी मिळून महापालिका 21 कोटी रुपये खर्च करणार आहे. पूर्वी हा रस्ता ४० फुटी होता. नंतर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तो १०० फुटी करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही जागा एरफोर्सकडून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्याबदल्यात एरफोर्सला पर्यायी जागा देण्याचे तरले. नगर रोडकडे त्यांना पर्यायी जागा देण्याला तत्वतः मान्यता देण्यात आली. नंतर एअरफोर्स विभागाकडून पाण्याच्या लाईन महापालिकेने बदलून देण्याची मागणी केली. तसेच इलेकट्रीक केबल, उच्च दाब वाहिनी देखील बदलून देण्याची मागणी केली. संबधित विभागाला पाण्याच्या ३ लाईन ऐवजी एक मोठी लाईन बदलून देण्यात आली. त्यांच्या मागण्यांनुसार सर्व कामे महापालिकेकडे पाठपुरावा करून पूर्ण करून देण्यात आल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.
नंतरच्या काळात वृक्ष तोडण्याची कायदेशीर परवानगी देखील घेण्यात आली. या सर्व प्रक्रिया महापालिकेकडे पाठपुरावा करून घेतल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. नंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत १ जानेवारी २०१६ मध्ये या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन देखील केले. सुमारे १२ कोटी रुपये पर्यंत खर्च करून जेल रोड पोलिस चौकी ते संजय पार्क पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करून घेतले. टप्प्याटप्याने इतर कामे करण्यात येणार आहेत. सध्या महापालिका २१ कोटी रुपये खर्च करून उर्वरित रस्त्याचे काम करणार आहेत. आरपीआयच्या वतीने केलेल्या पाच वर्षातील पाठपुराव्याचे हे यश असल्याचे डॉ. धेंडे म्हणाले.
गेल्या ५ वर्षांपासून मी या रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी पाठपुरावा करत आहे. या मधील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लक्ष दिले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उदघाटन करून पहिल्या टप्प्यात काम पूर्ण देखील केले आहे. पक्षाच्या वतीने मी केलेल्या पाठपुराव्याचे हे यश आहे. इतर लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन मी हे काम केले. आता अनेक जण त्याचे श्रेय घेत आहेत. मात्र इथून पुढे पाठपुरावा करून त्यांनी श्रेय घ्यावे. आधीच्या कामाचे श्रेय घेऊ नये.
- डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका