श्री शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर
पिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) – चिंचवड येथील श्री शंकर महाराज सेवा मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील श्री राम मंदिर, चापेकर वाड्यासमोर रविवारी (दि. 26) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निमित्त आहे गुढी पाडवा, स्वामी जयंती, रामनवमी व हनुमान जन्मोत्सवानिमित्त सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. छत्रपती संभाजीनगर येथून रक्त संकलित करण्यासाठी ब्लड बॅंक येणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.