भाजपा हातकणंगले लोकसभा निवडणूक प्रमुखपदी सत्यजित देशमुख
– भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
– आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी जबाबदारी
सांगली : डेली महाराष्ट्र न्यूज
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून संघटनात्मक मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुखपदी सत्यजित देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघाच्या प्रमुखांची घोषणा केली. त्यामध्ये देशमुख यांना हातकंणगलेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील मतदार संघांचे प्रमुख पुढीलप्रमाणे –
मावळ – प्रशांत ठाकूर
पुणे – मुरलीधर मोहोळ.
बारामती- राहुल कुल
माढा- प्रशांत परिचारक
सातारा- अतूल भोसले
सांगली- दिपक शिंदे
हातकणंगले- सत्यजित देशमुख
कोल्हापूर- धनंजय महाडिक
———————-
- प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज.
- मो. नं – 7350266967