ऐतवडे बुद्रुक मध्ये उभारणार ५० लाखांचे सुसज्ज ‘सामाजिक सभागृह’
- आमदार मानसिंग नाईक निधीबाबत सकारात्मक
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन
सांगली ! प्रदीप लोखंडे
ऐतवडे बुद्रुक मधील ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक १ मध्ये सुसज्ज सामाजिक सभागृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी येणाऱ्या ५० लाख रुपयांच्या निधीसाठी शिराळा विधानसभेचे आमदार मानसिंग नाईक यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि. २६) आमदार नाईक यांच्या निवासस्थानी भेट घेऊन निधीबाबत मागणी केली. या वेळी आमदार नाईक यांनी जिल्हा नियोजन समितीमधुन 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली.
आमदार नाईक यांच्या भेटीदरम्यान ऐतवडे बुद्रुकचे सरपंच सुभाष कुंभार, उपसरपंच संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे, वारणा बँकेचे संचालक अरविंद बुद्रुक, माजी पंचायत समिती सदस्या नंदिनी कांबळे, एमएमआरडीएचे अधिकारी सुधीर कांबळे, शासकीय अधिकारी प्रवीण लोखंडे, ग्रामपंचायतचे माजी सदस्य दादासो कांबळे, माजी सरपंच सलीम जमादार, दिलीप कांबळे, अजित कांबळे. प्रभाकर कांबळे, पत्रकार राजेश कांबळे, संदीप कांबळे, देवदास कांबळे, प्रतीक कांबळे, रोहित सुर्यगंध, विजयराज कांबळे, कुबेर कांबळे, पोपट कांबळे, प्रतीकराज कांबळे, आशिष कांबळे, अभिजित कांबळे आदीसह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या अनेक महिन्यांपासून सामाजिक सभागृह उभा करण्याचा संकल्प डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा सुरू होता. नुकतेच आमदार नाईक यांनी आपल्या विकासकामांची यादी प्रसिद्ध केली होती. त्या मध्ये या सभागृहाचा देखील समावेश करावा अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्या नुसार स्थानिक जिल्हा नियोजन मधून 50 लाखाचा निधी मंजूर असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.
सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध सामाजिक विषयातील पुस्तकांचे ग्रंथालय, व्यायामशाळा आदींचा त्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. उपसरपंच संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आमदार नाईक यांच्याकडे दोन वेळा प्रस्ताव सादर केला होता. तसेच निधी मिळावा यासाठी सातत्याने भेट घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले.
——————————————————–
- प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज
- मो. नं – 7350266967