केदारवाडीचा ‘पुष्पा’ कासेगावच्या ‘सिंघम’ पोलिसांसमोर झुकला

– 92 लाखांचे रक्तचंदन पोलिसांकडून जप्त ; आरोपी अटकेत

– सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांच्या टीमची दमदार कामगिरी

सांगली ! प्रदीप लोखंडे

पुष्पा सिनेमाप्रमाणे बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने रक्तचंदनाचे ओंडके आणलेल्या केदारवाडीच्या दोन आरोपींच्या कासेगाव (जि. सांगली) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कासेगावच्या सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांच्या टीमने ही दमदार कामगिरी केली आहे. रक्तचंदनाची एकुण  ७५८.४०० किलोग्रॅम वजनाच्या ९१ लाख ८०० रुपये किंमतीची २० लाकडी ओंडके पोलिसांनी जप्त केली आहेत. 

युनूस भैय्या (पूर्ण नाव माहिती नाही) आणि विजय बाळासाहेब तांबवे (रा. केदारवाडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दोन दिवसापुर्वी रक्तचंदन लाकडाचे ओंडके बेकायदेशीर प्रमाणे विक्री करणेच्या उद्देशाने आणली आहेत, अशी गोपनीय बातमी कासेगांव पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचारी पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, दीपक हांडे, दीपक घस्ते, आनंद देसाई यांना मिळाली. त्यांनी प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक दीपक जाधव यांना कळविली. जाधव यांनी पोलीस अधिक्षक बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग पथकाकडील वनअधिकारी महीला वनरक्षक एस. टी. वाघमारे, व्ही.व्ही. डुबल व कर्मचारी तसेच पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांच्यासह छापा टाकला. या वेळी जयकर तुकाराम पाटील (रा.केदारवाडी ता.वाळवा) यांचे मालकीच्या घरात रक्तचंदनाची एकुण २० लाकडी ओंडके आढळली. एकुण  ७५८.४०० किलोग्रॅम वजनाच्या या ओंढक्याची किंमत ९१ लाख ८०० रुपये आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रकांत पवार हे करीत आहेत.

पोलीस अधिक्षक बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव, पोलिस फौजदार आर. पाटील, सहायक पोलिस फौजदार माणिक मोरे, कुमार शेणेकर, पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल पाटील, दीपक हांडे, विजय पाटील, सचिन चव्हाण, सुरेंद्र पाटील, संग्राम कुंभार, जयकर सुतार, अविनाश लोहार, सचिन पाटील, संदीप सावंत, पोलिस कॉन्स्टेबल शरद कुंभार, दीपक घस्ते, आनंदा देसाई, तुषार जाधव, संजय गलगुडे, दीपक पवार, दीपक शिंदे, विशाल भोसले, वैशाली मोरे यांनी ही कामगिरी केली. 

—————————————

प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज

– मो. नं – 7350266967

Share to