७४व्या जयंतीनिमित्त रहाटणीत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा
लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व मा. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन मित्र परिवाराच्या वतीने अभिवादन
रहाटणी – देशातील कष्टकरी, शेतमजूर, गोर गरीब जनतेचा हक्काचा आवाज म्हणून ओळख असलेले लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ७४व्या जयंतीनिमित्त कै. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर आणि माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना रहाटणी येथे अभिवादन करण्यात आले.
रहाटणी येथील स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे मार्ग याठिकाणी कै. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रबोधनकार शारदा मुंडे, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, माजी नगरसेविका सविता खुळे, माजी नगरसेविका योगिता नागरगोजे, मीनाक्षी खाडे, माजी स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश नखाते, नरेश खुळे, टाटा मोटर्स युनियन प्रतिनिधी नामदेव शिंत्रे, टाटा मोटर्स कर्मचारी सहकारी पतपेढी खजिनदार सुभाष दराडे, दीपक नागरगोजे, धोंडीराम कुंभार, बाळासाहेब साळुंखे, नेवसे सर, घोडके काका, दीपक जाधव, भटक्या विमुक्त जाती भाजपा शहरअध्यक्ष गणेश ढाकणे, कैलास सानप, हंसराज सानप सचिन थोरवे, प्रकाश दहिफळे, सहदेव सानप, विनोद मुंढे, लक्ष्मण गरकळ, अरुण घोळवे सर, ज्ञानेश्वर नागरगोजे, संभाजी नागरगोजे, गणेश नागरगोजे, मयूर गवारे, विशाल नागरगोजे, गणेश शिरसाट, अवधूत कुटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
यावेळी प्रबोधनकार शारदा मुंडे यांनी कै. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनीही कै. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करताना म्हणाले की, कै. गोपीनाथजी मुंडे यांची ग्रामीण भागाशी नाळ घट्ट जोडलेली होती. तळागाळातील माणसांशी त्यांचे एक अनोखे नाते निर्माण झाले होते. कुठलाही वारसा नसताना, राजकारणात शिखर गाठणारा अद्वितीय नेता, अशी त्यांची खरी ओळख होती. राजकारणात लागणारी जिद्द, संयम आणि माणसं जोडण्याची कला त्यांना आत्मसात होती. राज्यातील उपेक्षित, शोषित, पीडित समाजाचे त्यांनी नेतृत्व करून अशा समाजाला आत्मसन्मानाची जाणीव त्यांनी करून दिली. असा नेता पुन्हा होणे नाही.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक नागरगोजे यांनी केले. तर आभार माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी मानले.