कुरळपच्या अशोक पाटील यांची गावागावात वाढली ‘क्रेझ’

गाठीभेटी, सामाजिक उपक्रमांना मदत केल्याने समर्थक वाढले

सांगली : प्रदीप लोखंडे

राजारामबापू कारखान्याचे माजी चेअरमन असणाऱ्या पिआर पाटील यांच्या कुरळप गावच्या बालेकिल्ल्याला धक्का देत सत्ता बदल करण्याचे काम पैलवान अशोक पाटील यांनी केले. त्याची दखल घेत भारतीय जनता पार्टीच्या सांगली जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी पाटील यांची नेमणूक करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या पीआर पाटील यांच्या गटाला ग्रामपंचायत मधून खाली खेचल्यामुळे अशोक पाटील यांची गावागावात क्रेझ निर्माण झाली आहे. सध्या कुरळप गावासह आजूबाजूच्या गावात त्यांच्या वाढलेल्या गाठीभेटी, सामाजिक उपक्रमांना केली जाणारी मदत यामुळे पाटील यांचे समर्थक वाढले असल्याचे चित्र आहे.

माजी अर्थमंत्री तथा आमदार जयंत पाटील यांचे निष्ठावान असणाऱ्या पिआर पाटील यांची वीस वर्षांपेक्षा अधिक काळ कुरळप गावात ग्रामपंचायतमध्ये सत्ता होती. या गावात विरोधक नसल्याने सर्वच निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठे मताधिक्य मिळत होते. कालांतराने अशोक पाटील यांची कुरळपच्या राजकारणात एन्ट्री झाली. त्यामुळे पीआर पाटील यांना तगडा विरोधक मिळाला. गावातील विविध निवडणुकींमध्ये अशोक पाटील यांनी राष्ट्रवादीला नमविण्याचे काम केले. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता उलथवून लावल्याने अशोक पाटील यांची क्रेझ गावागावासह जिल्ह्यात निर्माण झाली. 

त्यांच्या कामाची दखल घेत सांगली जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी निवड करत भाजपाने ताकद देण्याचे काम केले. सध्या अशोक पाटील यांनी इतर गावात गाठीभेटी वाढविल्या आहेत. ऐतवडे बुद्रुक, शेखरवाडी, करंजवडे, ढगेवाडी, कार्वे, कापरी, डोंगरवाडी आदीसह विविध गावात त्यांचे समर्थक वाढले आहेत. तर तरुणांमध्ये देखील त्यांची क्रेझ असल्याचे दिसते. 

या बाबत संतोष माने म्हणाले की, अशोक पाटील विविध सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देत आहेत. नागरिकांना मदत करत आहेत. राजकारण न करता येणाऱ्या प्रत्येकाला मदत करण्याची त्यांची भावना आहे. 

सामाजिक उपक्रमांना मदत –

बैलगाडा शर्यत, रक्तदान शिबिर, मंदिर जीर्णोद्धार आदीसह विविध कामांना मदत करण्यासाठी अशोक पाटील पुढाकार घेत आहेत. ऐतवडे बुद्रुक येथे नवरात्र उत्सवात सुमारे ३०० पेक्षा अधिक घरात फराळ वाटप केले असल्याची माहिती संतोष माने यांनी दिली. कुरळप गावात देखील कोरोना काळात वैद्यकीय मदत, मोफत धान्य वाटप केले आहे. सद्या प्रत्येक गावात त्यांना बोलावण्याचा आग्रह तरुण करताना दिसत आहेत.

जिल्हा परिषदेसाठी सक्षम नेतृत्व – 

आगामी काळात येणाऱ्या कुरळप जिल्हा परिषद मतदारसंघात सक्षम उमेदवार म्हणून अशोक पाटील यांच्या नावाची चर्चा होत आहे. गावागावात त्यांनी निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांची फळी, सकारात्मक राजकारण याच्या जोरावर ते विजयाचा गुलाल घेतील असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत 

——————-

प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्युज

मो. नं – 7350266967

Share to