उसणे पैसे दिले नाहीत म्हणून एकाला बेदम मारहाण

पिंपरी | महाईन्यूज

उसने पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एकाला फरशीचे तुकडे फेकून मारून जखमी केले. घराच्या दरवाज्यावर लाथा बुक्क्या मारून खल्लास करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार ममता एंटरप्रायजेस जवळ मारुंजी रोड हिंजवडी येथे काल सायंकाळी सव्वाआठच्या समारास घडला.

याप्रकरणी  लक्ष्मण अशोक मांजरे (वय 25, रा. ममता एंटरप्रायजेस जवळ, मारुंजी रोड, हिंजवडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. गणेश भगवान मांजरे (वय 30 रा. ममता एंटरप्रायजेस जवळ, मारुंजी रोड, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण याने गणेश यांच्याकडे उसणे पैसे मागितले. ते देण्यास गणेशनी नकार दिला. यावरून भांडण काढून लक्ष्मणने शिवीगाळ केली. फरशीचे तुकडे फेकून मारले. यात गणेश जखमी झाले. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांना घरात जाऊन दरवाजाची आतील कडी लावून घेतली. त्यावर लक्ष्मणने दरवाजावर लाथाबुक्क्या मारल्या. तुम्ही बाहेर या, मी तुम्हाला मारून टाकणार आहे, अशी धमकी दिली. गणेश यांच्या दुचाकीची तोडफोड केली. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

Share to