ऐन दिवाळीत एसटीच्या प्रवास दरात वाढ, आजपासून नवीन तिकीट दर लागू

मुंबई – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तिकिटामध्ये तब्बल 17 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. या तिकीटवाढीमुळे आता एसटीचा प्रवास महागणार असून आज (25 ऑक्टोबर) मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील.

गेल्या काही महिन्यांपासून इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. इंधन महागल्यामुळे आर्थिक गणितं जुळवताना एसटी महामंडळाची दमछाक होत होती. त्यामुळे आता ऐन दिवाळीच्या हंगामात एसटीने तिकीट दरात वाढ केली आहे. दीपावली हा सण साजरा करण्यासाठी चाकरमाने शहरातून आपापल्या गावी जातात. प्रवाशांची मोठी गर्दी असते. असे असतानाही एसटीच्या तिकीट दरात तब्बल 17 टक्‍क्‍यांची वाढ करण्यात आली आहे.

Share to