शहरात गुरूवारी पाणी पुरवठा राहणार बंद

पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्ती आणि शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.

त्यामुळे उद्या गुरुवार (दि. २५) रोजी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. पालिकेकडून होणारा सकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठाही बंद राहणार आहे.

दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि. २६) रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठाही अनियमित होण्याची शक्यता होती.

Share to