लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करा, कुटुंबियांकडून विनंती
पुणे (प्रतिनिधी) – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या १५-१६ दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
लतादीदींच्या कुटुंबीयांकडून विनंती
‘डॉ. प्रतित समदानी यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमकडून लतादीदींवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यास आम्ही तुम्हाला माहिती देऊ. तुम्ही नकारात्मक अफवांना बळी पडू नका आणि दीदी लवकर बरे व्हाव्यात आणि घरी परत याव्यात यासाठी प्रार्थना करुयात. माध्यमांनीही आम्हाला थोडा वेळ द्यावा. सध्या लतादीदींच्या प्रकृतीपेक्षा काहीही महत्त्वाचं नाही,’ असं त्यांनी म्हटलंय.
लता मंगेशकर यांना ९ जानेवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू असून कोणतीही अफवा पसरवू नका असं आवाहन त्यांच्या कुटुंबियांसह डॉक्टरांनीही केलं आहे.