ऐतवडे बुद्रुक मधील गुणवंतांचा सन्मान

  • पोलिस अधिकारी प्रविण लोखंडे यांचा कौतुकास्पद उपक्रम

सांगली ! महाईन्युज
ऐतवडे बुद्रुक येथील 10 वी, 12 वी, पदवीसह विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंतांचा शासकीय अधिकारी प्रविण लोखंडे यांनी सन्मान केला. संबंधीत गुणवंतांना शालेय साहित्य, पुष्पगुच्छ देण्यात आला. दरवर्षी प्रविण लोखंडे यांच्याकडून हा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. त्यांच्या या उपक्रमाचे समाजबांधवांकडून कौतुक करण्यात आले.

हलाखीच्या परिस्थितीवर मात करून यश संपादन केल्यानंतर आपणही समाजाचे देणे लागतो, या उद्देशाने पोलिस अधिकारी प्रविण लोखंडे समाज बांधवांसाठी स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करत आहेत. 10 वी, 12 वी, पदवीसह इतर क्षेत्रात समाजातील बांधवांनी यश प्राप्त केल्यास त्यांच्या घरी जाऊन लोखंडे यांच्याकडून सन्मान केला जात आहे. वैयक्‍तीक खर्चाने शालेय साहित्याचे ते वाटप करत आहेत. दरवर्षी त्यांच्याकडून हा उपक्रम राबविला जात आहे. यंदाच्या वर्षीही त्यांनी ऐतवडे बुद्रुक येथील गुणवंतांचा सन्मान करत आपल्या या उपक्रमात सातत्य ठेवले.

या वेळी 10 वी उत्तीर्ण झाल्याबद्दल दिक्षा नितीन विरभक्त, अनुजा मुकेश कांबळे यांचा तर 12 वी उत्तीर्ण झाल्याबद्दल विद्या अभिजीत चांदणे यांचा सन्मान करण्यात आला. पदवी परिक्षेत यश मिळवित उत्तीर्ण झालेल्या मनाली रवींद्र कांबळे, प्रिती मारुती कांबळे, योगिता राजेंद्र कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. या बरोबरच अंगणवाडीतील व्यवस्थापनाच्या भरतीमध्ये नियुक्‍ती झाल्याबद्दल वैशाली रामदास कांबळे यांचा तर फेलोशिप मिळाल्याबद्दल मंदा अमर सोनताटे यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी वारणा बॅंक कर्मचारी देवदास कांबळे, महाडिक पतसंस्थेचे कर्मचारी सुरज कांबळे, माजी उपसरपंच प्रतिनिधी प्रमोद कांबळे, सुरज लोखंडे, किरण कांबळे, पत्रकार राजेश कांबळे, कार्यकर्ते प्रवीण कांबळे, तेजस कांबळे, गणेश कांबळे, कलारत्न बँजो ग्रुपचे संस्थापक सनी कांबळे आदीसह समाज बांधव उपस्थित होते.

 ——————————

Share to