जयंत पाटील यांच्याकडून महाईन्यूजच्या बातमीची दखल

पिक विमा परतावा मिळणेसाठी विमा कंपनीला आदेश द्या ; कृषिमंत्र्यांकडे पाटील यांचा पत्रव्यवहार

वाळवा / प्रदीप लोखंडे

सांगली जिल्ह्यातील ‘बळीराजाला मिळेना पीक विम्याचा आधार‘ या मथळ्याखाली ‘महाईन्यूज‘ मध्ये 23 ऑगस्ट रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. या मध्ये पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे असा सविस्तर उल्लेख केला होता. या बातमीची दखल खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आहे. त्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना पत्रव्यवहार करून शेतकऱ्यांना पीक विमा देणेबाबत विमा कंपन्यांना आदेश द्या, अशी मागणी केली आहे. 

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना जयंत पाटील यांनी दिलेले पत्र

जयंत पाटील यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, सांगली जिल्ह्यात सलग २५ दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसात खंड पडल्यामुळे सोयीबीन, भुईमुग, आदी पिकांच्या उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा पेक्षा अधिक घट येणार आहे. या परिस्थितीमुळे सर्व शेतकरी चिंतेत आहेत. ते आंदोलनाच्या मनस्थितीत आहेत. जिल्ह्यातील सरसकट शेतकरी बांधवाना पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत ५० टक्के अग्रीम पीक विमा परतावा मिळावा यासाठी हंगामातील प्रतीकुल परिस्थिती (मीड सीझन) लागु करण्यासाठी विमा कंपनीला आदेश पारीत होणे गरजेचे आहे. तरी शेतकऱ्यांच्या अडचणीचा विचार करून याबाबत उचित कार्यवाही तात्काळ व्हावी असे नमूद केले आहे.

या बाबत महाईन्यूज मध्ये देखील सविस्तर वृत्त दिले होते. ऐतवडे बुद्रुकचे शहाजी गायकवाड यांनी देखील यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेऊन जयंत पाटील यांनी केलेला पत्रव्यवहार बळीराजाला दिलासा देणारा आहे.

23 ऑगस्ट रोजी महाईन्यूज ने दिलेली सविस्तर बातमी

———————————

प्रदीप लोखंडे, संपादक, महाईन्यूज

– मो. नं – 7350266967

Share to